पेरूच्या फ़ांदीवर बसुन देखील
पोपट उपाशी
सारे पेरू खाउन गेले
कावळे मघाशी
पोपट म्हणतो. . .
आह ! पेरूच खरा
पेरूच्या पानालादेखील काय स्वाद आहे
सारे कावळे म्हणजे
जन्माची ब्याद आहेत !
कावळे म्हणतात. . .
पोपट पेरू पेरू काय खातो
म्हणून आम्ही सुद्धा मारल्या टोचा
आता बिया अडकल्या आहेत बुडाशी
आणि झालाय सगळाच लोच्या. . .
सत्यजित.
वा!!! उत्तरप्रदेश निकालांचा वास येतोय का तुमच्या पेरूला? अप्रतीम जमलीय, काक-शुकांची कैफियत!! [:)]
ReplyDeletechaan
ReplyDelete