सरींचा हाती हात
धारांची बांधली गाठ
थेंबांच्या अक्षता अन
थेंबांचाच आंतरपाट
धारांची बांधली गाठ
थेंबांच्या अक्षता अन
थेंबांचाच आंतरपाट
विजेची रोषणाई
चौघडा गडगडाट
नभांचा झुलता मंडप
सरींचा गलबलाट
चौघडा गडगडाट
नभांचा झुलता मंडप
सरींचा गलबलाट
वार्याचे वरातीला
आणले अबलक घोडे
किरणे रुळती मानेवर
पायी तृणांचे तोडे
आणले अबलक घोडे
किरणे रुळती मानेवर
पायी तृणांचे तोडे
रानातील शीळ सखी
कानी आचरट बोले
पागोळ्या ढाळती अश्रू
मायेचे डोळे ओले
कानी आचरट बोले
पागोळ्या ढाळती अश्रू
मायेचे डोळे ओले
दूरदेशी गेला पाऊस
अंगण झाले सुने
पाचोळा झाले हात
कुरवाळीती लेकीचे जुने
अंगण झाले सुने
पाचोळा झाले हात
कुरवाळीती लेकीचे जुने
-सत्यजित.
फार सुंदर वर्णन केलं आहे.
ReplyDeleteखुप छान कविता आहे.आमच्या ब्लॉग नक्की भेट द्या.
ReplyDeleteJIo Marathi