Monday, January 28, 2008

चांदोमामाचा पॉपकॉर्न (बालकविता)

हनुवटीवर हात ठेवुन
चांदोमामा बसला
मनात विचार आला
विचार करत असेल कसला?

करत असेल का हा विचार
त्याच्या बदलणार्‍या रुपाचा?
की समोर मांडुन ठेवल्या,
लाह्या भरल्या सुपाचा?

वाटत असेल जेंव्हा
त्याला खावासा पॉपकॉन
हळुच एक चांदणी उचलुन
तोंडात टाकत असेल गपकन.

सत्यजित.

1 comment:

  1. Thought process मस्तच आहे. पण कुठेतरी शेवटी भरकटल्यासारखी वाटतेय.

    चांदण्या म्हणजे पॉपकॉर्न्स. असा विचार करायला लहान मुलाचंच मन पाहिजे. लगे रहो!

    ReplyDelete