आ़जी ने दिला बत्तासा वर आभाळात फेकला
आभाळातच अडकून त्याचा चांदोमामा झाला
वाटत रोज चोरुन बप्पा, माझा बत्तासा खातो
तरीच रोज चंद्र अस्सा छोटा छोटा होतो
हळुहळू करत त्याने एकदा सगळाच गटम केला
थांब म्हणालो, तुझ नाव आता सांगतो आजीला..
आजीच नाव घेताच एकदम घेला घाबरुन
देईन म्हाणाला बत्तासा पण थोडा थोडा करुन
बप्पा बिच्चारा एकच बत्तासा पुरवुन पुरवुन खातो
थांब म्हणालो आज्जीकडुन तुला पण एक देतो
:( प्रसाद आहे म्हणाली आज्जी एकच बत्तासा मिळेल
पण मी बप्पासाठीच मागतोय ना, पण ते तिला कसं कळेल?
आज्जी म्हणाली..
अर्धा पण खात नाहीस पण रोज दोन बत्तासे मागतोस
तुझा उष्टावलेला अर्धा मग बप्पा समोर का ठेवतोस?
अगं आज्जी..रोज चंद्र खाण्यापेक्षा बप्पाला बत्तासा खाऊ दे
मला म्हातारीला फसवतोस काय? चल मला जाउ दे..
आज्जी देत नाही म्हणुन हा रोज चंद्र खातो
नाव सांगु का आज्जीला? म्हणताच सगळा परत देतो... :))
हा.. हा घाबलला...
-सत्यजित
फारच छान कविता! तुझ्या इतरही कविता वाचल्या, त्यातल्या बालकविता नक्की पुस्तक रुपात आणण्याचा प्रयत्न कर. बालवाचक ब्लॉग वाचत नसणार आणि तुझ्या कविता मुलं नक्कीच एन्जॉय करतील अशा आहेत!
ReplyDeleteसुंदर! ही कविता सुद्धा आवडली. पुन्हा सांगते. कल्पनाशक्ती उत्तुंग भरार्या मारते आहे. तिला सोप्या शब्दांत बद्ध करा. इतक्या छान कवितांचं पुस्तक काढलंत तर आम्हीही विकत घेऊ हो.
ReplyDelete