Sunday, March 16, 2008

गोरापान चांदोमामा (बालकविता)

का गं आई चांदोमामा
असतो गोरा गोरा पान?
शुभ्र ढगांच्या फेसात तो
आंघोळ करतो छान..

उंच उंच ढगात
त्याचा बाथटब असतो
दिवसभर शुभ्र फेसात
आंघोळ करत बसतो

त्याची झाली आंघोळ की
ढग काळे काळे होतात
भराभर पाणी ओतुन
चांदण्या त्यांना धुतात

पाऊस पडुन गेला की
कसं स्वच्छ स्वच्छ वाटतं
मग चांदण पण पावडर लावुन
छान छान नटतं.

-सत्यजित.

2 comments:

  1. farach chan! khoop awadli hi kawita. keep it up! shabd ajun thode soppe waprta ale tar praytna karun paha...like 'swatcha-swatcha waata'..he ekhadya mulala gungunayla sope nahi..else kharach kawitela koni chali lawawyat ashya ahet. age badho!

    ReplyDelete
  2. इरावती ताई म्हणतात तसं शब्द थोडे सोपे वापरा. पण काय कविता लिहिल्यात! जबरदस्त!

    ReplyDelete