झाली मज विषबाधा
तव जहरी नयनांची
झाली राख आता
मी रचिल्या कवनांची
असा घाव केलास
जो लागला जिव्हारी
तरी कवटाळूनी घ्यावे
तुझे डंख हे विखारी
दिला डंख उरी अन
पंख दिले मनाला
तू तरु हो मनाचा
दे आसरा खगाला
ह्या सावजास सांगा
का आवडे शिकारी?
झेलुनी घाव सारे
मरणास ये खुमारी
मी घायाळ काळजानी
आक्रंदतो तुला स्मरूनी
मी विषावर जगतो आहे
तुजवर कित्येकदा मरूनी
- सत्यजित
No comments:
Post a Comment