समुद्र होऊन जग किंवा जग कस्पटा सारखा
कुणाला न कुणाचा थांग माणूस माणसास पारखा..
कस्पटाची चाले फरफट उडत राहतं वाऱ्या वरती
आणि हजारो मैला वरचा चंद्र समुद्राला देतो भरती
कुणाला का कुणाची ओढ? सांगता येत नाही
कुणाला का कुणाचं वेड? जोखता येत नाही
चंद्र विलगता पृथ्वी पासून पृथ्वी इतकी रडली
समुद्र म्हणतो आपण ज्याला ती अश्रूंनी भरली खळगी
म्हणून तर समुद्राच पाणी आपण पिऊ शकत नाही
कितीही वाटलं तरी दुसऱ्याचं दुःख आपण घेऊ शकत नाही
मग समुद्र होऊन जग किंवा जग कस्पटा सारखा
कितीही आपलासं वाटलं तरी
माणूस असतो माणसास पारखा..
-सत्यजित.