Friday, July 8, 2011

ग्लोबल वॉर्मींग ड्रावं-ड्रांव... ड्रूक... ( बालकविता )

एक बेडु़क होता करत ड्रांव ड्रावं
"बेडुक दादा असं काय करताय रावं?"

'पाऊस नाही आला, आलाय मला राग
जरा गाऊन बघतो, मी मेघ-मल्हार राग'

"अरे बेडुक दादा, असा चिडुन नको गाऊस
नाहीतर येणार नाही, कधीच पाऊस"

'ढग नाही, वारा नाही, पाऊस पडत नाही
तुमच्या घरी नळ आहे तुमच अडत नाही'

'अरे..
बघ जरा टीव्ही लाऊन, काही बातमी देतात काय?
मासा काल म्हणत होता ग्लोबल वॉर्मींग हाय'

'ग्लोबल वॉर्मींग, ग्लोबल वॉर्मींग....ग्लोबल वॉर्मींग
आता हे आणि काय?'
"अरे दादा, आभाळातला एसी बंद पडला हाय"

"म्हणुन बाबांनी नवा बसवुन घेतलाय एसी"
'पुन्हा तुम्ही तुमचं बघा, आमची ऐशी-तैशी'

"मग काय करू? सांगतो, एसी लाऊ नका"
' नको, आम्ही प्राणि कुणा त्रास देतो का?"

'येवढच एक निरोप जाउन बाबांना तू सांग
सगळ्या प्राण्यांची, आमची येवढीच आहे मांग

तळ्या मधे, नदी मधे टाकू नका कचरा
सगळ्या सांड पाण्याचा नीट करा निचरा

प्लास्टीकच्या पिशव्या तुम्ही वापरु नका
उघड्यावरती कचरा कधीच टाकू नका'

"आत्ताच जाउन सांगतो तुझा निरोप
पण बेडुक दादा तू रागावू नकोस"

पुन्हा बेडु़क करू लागला ड्रांव.. ड्रावं...
"आता काय झालं? असं काय करताय रावं?"

"अरे,खुप आनंद झाला म्हणुन गातो आहे गाणं
वेड्या सारखे वागतात मोठे, एक बाळ शहाणं'
आहे एक बाळ शहाणं...
निरोप सांगणार ना रे बाळांन्नो..? :) '

ड्रांव, ड्रावं, ड्रांव ड्रावं-ड्रांव ड्रावं-ड्रांव... ड्रूक..
ड्रांव, ड्रावं, ड्रांव ड्रावं-ड्रांव ड्रावं-ड्रांव... ड्रूक...

-सत्यजित.

2 comments:

  1. सत्यजीत नमस्कार, खुप सुंदर.

    ReplyDelete
  2. मस्त रे!
    जी माणसं लहान मुलांना आनंद देतात, त्यांच्या हृदयातील परमेश्वर जागा असतो!

    तुझा ब्लॉग रीडरमध्ये आणलाय. म्हणजे आता मला छान कवितांची मेजवानी! :-)

    ReplyDelete