Tuesday, February 17, 2009

हनुमॅन माझा मित्र...(बालगीत)



सुपरमॅनला स्पाईडरमॅनला नाही अनुमान
सर्वात शक्तीशाली आहे माझा हनुमान

सुपरमॅनला दिली जर त्यानी एक फाईट
चड्डी वरची चड्डी पण होउन जाईल टाईट

स्पाईडरमॅनच्या छातीतुन निघेल एक कोळी
एकच फाइट देता घेईल जुलाबाची गोळी

एक उडी घेउन जातो साता समुद्राच्या पार
डोंगर उचलू शकतो त्याला शक्ती आहे फार

एकटाच गेला उडून नी लंका आला जाळून
रावण गेला घाबरुन, सगळे राक्षस गेले पळून

भक्ती त्याची शक्ती, नी भक्तीच त्याचं काम
छाती फाडुन दाखवेल तो अंतरातले राम

बोलो सियावर रामचंद्र की जय !!
बोलो हनुमान की जय.. !!

संकट येता कुठलेही तो करतो माझी रक्षा
मी सकाळ संध्याकाळी म्हणतो रोज रामरक्षा

मी दर शनिवारी म्हणतो मारुतीचं स्तोत्र
हनुमान झाला आहे खरंच माझा मित्र...

बोलो बंजरंग बली की जय !!!
बोलो हमुमान की जय.. !!!

-सत्यजित.

1 comment:

  1. मला बालकविता लिहीणा-यांचं विषेश कौतूक वाटतं.. मी शाळेत चौथीत असल्यापासून लिहीतेय पण एकही बालकविता या १२ वर्षांत झाली नाही.. जमतंच नाही ..येतंच नाही..
    सत्यजित उत्तम.. मूल होऊन गेलात लिहीताना...

    ReplyDelete