Friday, January 29, 2010

एक घास चंद्र ..

आई... तो का गं म्हणतो खेळायला एक चंद्र आण?
आई... मला नको चंद्र फक्त त्याचा एक तुकडा वाढ
आई... ह्या फुटक्या पत्र्याच्या डब्ब्यामध्ये
लाउया का गं एक स्वप्नाचं झाड?
स्वप्नाच्या झाडामागे तरी चंद्र लपेल का?...!!!
रात्र असली तरी अंधार कुठेच नसेल का?
त्या झाडाला लगतील ती स्वप्न मी पाहुन घेईन
माझ्यासाठी थोडी ठेवेन आणि...
थोडी आई तुला देईन..

-सत्यजित.

2 comments:

  1. मला पण एक चंद्र हवाय आता.
    काय काय आठवणी जाग्या झाल्यात, काय सांगु आता.

    ReplyDelete
  2. छान आहे... तुमच्या इतर कविताही एकदम मस्त आहेत... कीप इट अप!

    - विशल्या!

    ReplyDelete