Saturday, January 27, 2018

👩‍❤‍👩 चौदा फेब्रुवारीची आरती 💑

#valentine
#happyvalentinesday
#valentinesday
भक्तांनो, संत वव्हॅलेंटाईन महाराज दिन जवळ आलेला आहे. तर ज्यांचा जुळलेलं आहे त्यांचं जुळलेलं राहावं आणि ज्यांना जुळयच आहे त्यांचं लवकर जुळवं म्हणून ही आरती रचिलेली आहे. तर चौदा फेब्रुवारी पर्यंत रोज नित्य नियमाने आरतीचे मनोभावे गायन केल्यास व पाच पन्नास लोकांना फोरवर्ड पाठविल्यास, संत व्हॅलेंटाईन महाराज यंदा तुमचा 'कलेजा ठार, बेडा पार' करतील.

कवीचे नाव खोडून आपले टाकून पाठविल्यास शाप लागून "कुकर्माची जोड, होईल काडीमोड"

👩‍❤‍👩 चौदा फेब्रुवारीची आरती 💑

आरती व्हॅलेंटाईन
यंदा मिळू दे लाईन||
जुळू दे फाईन
आरती व्हॅलेंटाईन || धृ ||

एकाला असो वा जोडी
तुझी सर्वांना गोडी ||
चौदा फेब्रुवारी दिवशी
तू रहा रे पाठीशी||

आरती व्हॅलेंटाईन...❤

कितीजण माझ्या सारखे
असे प्रेमाला पारखे||
त्यांचा कर विचार
त्यांची नौका कर पार ||

आरती व्हॅलेंटाईन...❤

वर्षभर होते लपून ||
आज आले उफाळून||
ज्यांचे प्रेमाचे हे कढ
त्यांची भागव तू नड ||

आरती व्हॅलेंटाईन...❤

वर्षभर नाही जमले
यत्न करूनीया दमले ||
त्यांचा आज निर्धार
त्यांना तुझाच आधार||

आरती व्हॅलेंटाईन...❤

प्रपोज करता तिला
तिने होकार जर दिला||
गुणगान तुझे गाईन
मोठा बुके हि देईन||

आरती व्हॅलेंटाईन...❤

म्हणाली ती नाही तर
तुझं नाही काही खर||
मनसे जॉईन करिन
अँटी व्हेलेंटाईन होईन||

आरती व्हॅलेंटाईन...❤

पोरींना ही मिळो वर
जर असेल चांगली तर||
लागो माझा नंबर
उभा कसुनी  कंबर||

आरती व्हॅलेंटाईन...❤

प्रेमाचा तू शिरोमणी
ऐक माझी आळवणी||
मिळू दे रे एक तरी
मस्त भारीतली परी||

आरती व्हॅलेंटाईन.. ❤

प्रेमास मिळे गती
गाता व्हॅलेंटाईन महती
सत्याचे हे सत्यवचन
येते प्रचिती पटकन

आरती व्हॅलेंटाईन...❤

बोला व्हॅलेंटाईन अशी लवर दे की भारी वाट्टल! 😍😍😍
संत प्रेमदेव भुका राम ...
बोला व्हॅलेंटाईन  महाराज की जय...❤❤❤💋

-जन हितार्थ में जारी, पण लय भारी 😻

- सत्यजित.

No comments:

Post a Comment