उठा बापू उठा आणि
द्या पुन्हा अंहीसेचे धडे
तुम्ही उभारल्या पोकळ भींतीना
जाउ लागलेत तडे
रक्ताळलेला हा शुभ्र पंचा
कुठवर मिरवत फिराल
वाटल नव्हत.. त्याच्या शस्त्रास्त्रांच्या ढिगार्यात
तुम्ही एक रिकाम काडतुस होउन उराल
अस का केल बापू तुम्ही?
घर झाडू पण दिल नाहीत
आता घर साफ कराव म्हणल
तर भीतींच उरल्या नाहीत
एक गोचिड चिरडवी म्हटल तर
तुमच महात्म्य आडव येत
आपलच रक्त बोटाला लागव
तर हीरव्यांना वावड होत
तुमची आधराला घ्यावी काठी
तर ते उगारली म्हणतात
ती हाणुन आमच्या पाठी
ते सदैव कण्हत असतात
तुम्ही येवढी सवय केलीत
दुसर्यांचा मार खायची
त्यांनी एक हात छाटला
तर दुसरा पुढे करायची
तुम्हाला नोटेवरती छापलय
तुम्ही सारं जग व्यापलय
पिसाळलेल कुत्र देखिल
गोंजाराव म्हणत आपलय
तुमच्या अंहीसेच्या कुर्हाडीला
अर्धमाचा दांडा
पित्यानेच का घालावा
पोराच्या म्स्तकी धोंडा?
उठा बापू उठा आणि
द्या पुन्हा अंहीसेचे धडे
आम्ही अंगाखांद्यावर खेळवतोय
तुमचे रक्तपिपासु किडे...
No comments:
Post a Comment