Thursday, October 8, 2026

दिल तो बच्चा है जी ...


निळ्या नितळ आभाळी
शुभ्र ढगांचे पुंजके
हिरव्या कंद तृणांवर
स्लो मोशन मध्ये पडणाते तुषार
म्हणजे तू आलीस...
कसं काय जमतं तुला
असं निसर्ग पांघरून येण?
इवली पिवळी टिकली
जणू इवल ना़जूक रानफुल
पाठीवरली सैलसर वेणी
झुळके सरशी रानभुल
पहात रहावं तुला...
की बकूळ सडा पडतो
पहात रहावं तुला...
की अलवार प्राजक्त बहरतो

पहात रहीलं तुला...
की मी विचार करत नाही
विचार येत रहातात

तू माळलास गजरा
की वसंतोत्सव साजरा
तू माळतेस म्हणुन
सुंदर दिसतो गजरा
नाहीतर विकणार्‍यांच्या
हातावर नसत्या का
खिळल्या नजरा?
तूला जरा उशीर झाला की वेध लगतात
तुझे विचार वेड लावतात
तू आलीस की ऋतू कूस बदलतो

No comments:

Post a Comment