हृदय हे तिला द्यावे । प्रेम तिच्याशी योजावे ।
अर्पूनी हृदय घ्यावे । प्रेम दान हे ।
भले बाप तिचा किती भांडो । भले मत्सर किती वाढो ।
वाटल्यास तो उघडो । भांडार शिव्यांचे ।
बधीर पड्दे कानांचे होवो । तरी सय्यम मनी राहो ।
तो जे वांछील तो ते न लाहो । शेवटी सासर्याची जात ।
जमतील शत्रु मंडळी । प्रेमदेष्ट्यांची मांदीयाळी ।
त्यांत माजवून बंडाळी । त्यासी घालाव्या लाथा ।
मनी कालवाकालव। सासर मंडळींचा डाव ।
दाखवी भय । पोलिसांचे ।
लावले जरी किती लांच्छन । केल्या कृती किती हीन ।
भले किती दुर्जन । सासरा होवो ।
निर्लज्जम सदा सुखी । होवोनी प्रेमलोकी ।
कलांतरे बोलणी सासर्याची । होतील खंडीत ।
आणि प्रेमोपजीवीये । मिठीत घेता प्रिये ।
ओठांवर ओठ तिचे । ठेवावे जी ।
येथ मात्र सय्यम राहो । येथे आगतीक न होवो ।
होतो ती लग्ना नंतर होवो । म्हणजे सुखीया झालां ।
सत्यजित.
No comments:
Post a Comment